मृत्यूस दाद देवून गेले.....
पुरावे तिथले सारे ते मिटवून गेले
मृत्यूस माझ्या अपघात पटवून गेले
लेखणीत शब्द काही रक्तबंबाळ होते
आंधळे,बघ्याची भूमिका वठवून गेले
भिनभिणत्या ओळी प्रतेक्ष्य दर्शी होत्या
खऱ्या कवितेसही ते खोटे वदवून गेले
ओठात मिळाल्या अर्धवट चार ओळी
अंधारात निष्कर्ष ते पणतीचे ठरवून गेले
पंचनामा लेखकाचा वाचकाच्या हाती
कागदी ताबुतात ते मज पुरवून गेले
मी मागितली होती तुकडा दाद त्यांना
पश्चात माझ्या ते पाखरा घास भरवून गेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा