आज माझ्या स्वप्नांना...
तु आपलेले करुन जा...
जाता जाता स्वप्नांना त्या...
मला प्रत्यक्षात देऊन जा..
एकदा भेटायचे आहे मला..
या चंद्र चांदण्यांना..
विचारायचयं रात्रीच का पसरवतात..
हा खेळ चांदण्यांचा..
कातरवेळी स्पर्शुनी गेली मंद वारयाची झुळूक,
मिसळूनी सारे रंग ते, गडद झाले आभाळ,
बरसुनी त्या वर्षाधारा, ओघळते थेंब ते टिपताना,
तुझ्या कांतीवरती ते खेळताना, आठवले ते दिवस,
माझ्या मिठीत मिळणारी उब, अन तुझ्या स्पर्शासाठी मी अधीर,
जमले नाही जे मला, तुला सहजच जमले,
प्रेम माझे एकाकी, ते तसेच कावरेबावरे,
कैक प्रयत्न करुनी, नाही शमले ते, विजल्या अनंत पणत्या,
उरल्या फक्त माझ्या प्रेमाच्या अनंत पाउलखुणा, गहीरया, पावसात भिजलेल्या,
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या,,
amol ghayal
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा