बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

एक नातं जोडताना आपण

एक नातं जोडताना आपण
किती नात्यांना दुरावतो
एकाच्या जवळ जाताना
दुसऱ्याला .....विसरतो !

उन्हात आपण असलो कि
सावलीला नुसतं आठवतो
पण सावलीत गेलं कि मात्र
उन्हाला झिडकारतो !

जमिनीवर असलो कि
आभाळाला घाबरतो
पण उंच उडताना मात्र
जमिनीला सोडतो !

जगताना आपण नेहमी
स्वप्नांमागे चालतो
पण स्वप्नात असलो कि मात्र
जगण्याला सुनावतो !

का असं होत असेल
हेही तुम्हाला सांगतो
माणूस म्हणून जगताना
आपण माणसालाच विसरतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा