बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

असंच असतं...... तू हात हातात घेतलास कि मी

असंच असतं......
तू हात हातात
घेतलास कि मी
सोड सोड म्हणायचं ,
हवा असणारा
स्पर्श झाला कि
मोहरून जायचं !

असंच असतं .......
तू बोलत असताना
मी तुला एकटक
पाहत राहायचं ,
ते तुझ्या लक्षात आलं कि
मग मी लगेच नजरेला
दुसरीकडे वळवायचं !

असंच असतं.......
सर्दी होईल म्हणून
पावसात भिजायला
खोटं खोटं टाळायचं,
पण तू सोबत आलास कि
आणलेली छत्री मिटवून
तुझ्यासोबत भिजायचं !

असंच असतं........
रोज रात्री उगाच
झोपेचं सोंग घेऊन
सगळ्यांना फसवयाचं,
पण खोट्याच मिटलेल्या
त्या डोळ्यांनी गुपचूप
तुला स्वप्नात आणायचं !

असंच असतं ....
तुझ्यासमोर अबोल होणाऱ्या
लाजऱ्या माझ्या मनाला
एकांतात तुला भेटवायचं ,
आणि माझ्याही नकळत मग
तू पसरलेल्या मिठीत
स्वत :ला मिटून घ्यायचं !
असंच असतं ..................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा