बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

तू मला आभाळ दाखवलस,

खिडकीतून बोट करून
तू मला आभाळ दाखवलस,
...भरलेलं ...
पण ते तर माझ्याकडे
आधीपासूनच होतं ..
तेही तूच दिलेलं ...
ते रितं का करत नाहीस
म्हणून तू मला विचारलस .
पण ते रितं झाल्यावर
माझ्याजवळ कांही
उरतंच नाही ..
हे तू सोयीस्कर विसरलस!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा