मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

स्वप्न पाहायला तु शिकवले स्वप्नात जगायला तु शिकवले

स्वप्न पाहायला तु शिकवले
स्वप्नात जगायला तु शिकवले
स्वप्न तोडुनी तु गेलीस
पण तुझ्या गोड आठवणी स्वप्न करुन
जगायला मी शिकलो...



शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

कवा कवा येते याद तुई सखे
जीव माया "डिंग डॉंग" होऊन जाते
कसं मुसं होते.लळकुंडी येतात डोये...
एवळ्यात...
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

खात पीत नाही बराबर आता मी
मले तुया बगेर नाही राहवत
पोट्ट्या तश्या लय हायेत गावत
पण मले कोणाच तोंड नाही पाहवत
बुढा नसते घरात बुढी डोस्क लई खाते
एवळ्यात....
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

मी अजिता बच्चन तू माई जया
विल्लन जमान्याले येत नाई दया
पिर्माचा आपल्या पाय हैप्पी एंडिंग होते
पोट्टे पाट्टे माई मजा घेऊन जाते
एवळ्यात ...
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

अभाया इतलं पिरेम आपलं वाया नाही जाणार
काई हो सखे मी तुया अन तू माई होणार
जिन्दगानी पाय कशी तुई माई परीकशा घेते
खोट्या पिर्माले पास अन खरयाले फेल करून देते
जहाज आपली पाय आता कशी कशी गोते खाते
एवळ्यात........
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून देते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा