मी हिरवा गार
बरसलेल्या तुझ्या पावसाने
रेताड मी निवडूंग
शापित तुझ्या विरहाने....
तू गेल्यावर आता
एकटेपणाची भीती वाटत नाही
इतका भिनलाय एकटेपणा कि
माझी सावलीही सापडत नाही...
भरकटतो आपण जसे
नको ती वाट चालल्यावर
आयुष्यातून उठूही शकतो तसे
कोणाच्यातरी प्रेमात पडल्यावर...
विरहात वरुणाच्या फुटतो
बघ धरतीच्या मनी कंप .
असह्य होऊन मग होतो
पोटात तिच्या भूकंप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा