शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

तू खुदकन हसलीस कि.... सारे जीवन गालात हसते.

तुझ्या मिठीत येण्यास
आतुर हा जीव
हतबल हे हात
करी मनाची कीव



मी आहे थोडा वेगळा...
शब्दात रमून जाणारा...
तुझ्या आठवणींना ...
शब्दात जोडणारा.



कोजागिरीचा चंद्र कसा...
तुझ्या पुढे झुकतोय....
माझ्या या चांदणी समोर...
तो हि दोन क्षण मागतोय...



चेहरा तुझा ग....
जसा चंद्र पौर्णिमेचा ....
रुसतेस कधी कधी तू...
तो दिवस अमावाशेचा...


ओठांची किमया खरी..
ओठांनाच कळते...
ओठांवर ओठ टेकवताच...
ओठ ही थर थर कापते..


तू रुसलीस कि....
नशीब माझे रुसते...
तू खुदकन हसलीस कि....
सारे जीवन गालात हसते.




भिरभिरत्या पाखराचे ...
सुंदर पंख जाळीदार ....
पंखात बळ एवढे....
कि व्यापून जाईल आकाश सारं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा