नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे
समजून घे तू फरक
स्वप्न आणि सत्यातला
तुझा आणि माझ्यातला
फक्त वास्तव असलेला.
आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!
ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)
असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?
का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!
हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा