शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

हा पाऊसही तुझ्यासारखाच कधीही बरसतो

हा पाऊसही तुझ्यासारखाच
कधीही बरसतो
जाताना मला न चुकता सारी
तुझी स्वप्ने देऊन जातो





सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते
शतजन्मीचे हो माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुळी ही रुप गोजिरी
गोड शिरशिरी उरांत फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळाच्या देठाभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळूनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा