झाड झाड व मी बोलतो....!!
एक झाड पाहिलं
बरंच मोठं होतं
पण आयुष्यात त्याच्या
फारसं सुख नव्हतं...
मी त्याच्या जवळ बसलो
आम्ही दोघे सारखेच
अन रोजचे असून सुद्धा
एकमेकांना अनोळखेच....
झाड वयाने मोठे होते
मला भीतीयुक्त आदर होता
पण झाडाला त्या परिस्थितीचा
माझ्याशी काही आवच नव्ह्ता....!!
मला म्हणाले ते
'आता आपण दोघे सारखेच
वय वगैरे काही नाही
दुःख वाटून घेऊ दोघेच...!'
कुणी नाही मला
असे त्याचे दुःख
एकाकी नसावा कधीही मी
एवढे माझे सुख....
खरा मित्र माझा
हे झाडच आहे मला कळाले
इतर गोष्टींवरून आपसूकच
झाडे कडे माझे पाउल वळाले....!!
मला म्हणाले 'साथ तुझी लाभली
तर सुखाचा होईल आयुष्य प्रवास...'
मी म्हणालो 'साथ आहे मी
राहीन तुझ्या आश्रयास...!!'
गार वारा आला
आम्ही दोघेही सुखावलो
दोघांच्या मनाचे ओझे उतरले
पुन्हा आपापल्या मार्ग निघालो....
झाड झाड व मी बोलतो....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा