खरे जगणे हे असते विदुषकाचे...
दुसरयांच्या हास्यावर घास पोटी...
मनात दु:खाचे डोंगर तरी...
सदा हसूच असते ओठी..
रित्या माझ्या हृदया मध्ये..
ना हक्क तुझा सहवास...
राहतेस तू तिथे अशी..
जसा तूच माझा श्वास..
मी भिजलो पावसात की
त्या भिजलेल्या क्षणात तू...
आठवणींनी भरलेल्या आठवनींच्या
प्रत्येक कणा कणात तू...
रचून मी शब्द ओव्या...
शब्द बांध बांधले...
मी पुन्हा त्या शब्दांना...
या कवीतेत ओवीले..
समोर तु येताच...
होतेस अशी स्तब्ध...
तुझ्या प्रत्येक अबोल प्रश्नाला...
असतो मी ही निशब्द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा