शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

नशीब जोरावर असतं म्हणून सोन्यासारखी माणसं लाभतात,

नशीब जोरावर असतं म्हणून
सोन्यासारखी माणसं लाभतात,
कमतरता आपल्या जीवनातल्या
त्यांच्याचं येण्याने जागतात..!!

भेटलीस आम्हास दैवयोगाने
बनू तुझ्या अंगणातील फुले,
जीवनात आणिक काय हवं
पदरात घे तुझी हि लेकरे..!!

मनास मिळतो आधार खरा
नाही जाणवत मायेची उणीव,
शब्दांच्या खेळात रमताना
आपलेपणाची दिलीस जाणीव..!!

नाही विसरणार कधीचं प्रेमाला
लाभलं जे ह्या फसव्या दुनियेत,
ताई बनून आलीस आमच्यात
आमचीचं झालीस शब्द किमयेत..!!

रुसवे-फुगवे, मस्ती-मजाक छान
गप्पा-गोष्टी समजुतीची अशी जाण,
गरज लागायची आधाराची जेव्हा
जाणवून दिलंस सत्याचं भान..!!

तुझी साथ ताई हवी आहे कायम
आयुष्याच्या ह्या खडतर प्रवासात,
दोन शब्द प्रेमाचे पाहिजेत मला
सहभागी होण्या सुख दु:खात..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा