कधी कधी प्रवास
संपूच नये असं वाटतं
संपण्यासाठी प्रवास
असूच नये असं वाटतं
कादंबरी म्हणून उल्लेख करावा
त्याला सुरवात असावी पण शेवट नसावा..
प्रत्येक पानावर तुझ्या प्रेमाचे शब्द असावे
फक्त त्या शब्दांना पूर्णविराम नसावा...
तुझ्यासाठी जगताना
आणखी काही काय हवं होतं
तुझ्यासाठी मरताना
मात्र मरण माझ स्वस्त होतं
मी असताना केवळ
जगण्याची आशा कर
का जातेस दूर अशी
मजसाठी मरणावरही मात कर
तुझ्यासाठी जगताना
आणखी काही काय हवं होतं
तुझ्यासाठी मरताना
मात्र मरण माझ स्वस्त होतं
आलो जरी मी स्वप्न रुपी जीवनात
राहीन सदैव तव नयनांत
ठाव घेउनी हृदयाचा
तू पाहिलेलं स्वप्न आणेन सत्यात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा