पहाटवारा सांगत होता
गुज ते कळ्यांचे तिला
पहाटवारा सांगत होता
गंध मोगर्याचा उधळीत
केसात तिच्या रांगत होता
गुंतले सहज उकलून धागे
सोनेरी त्या प्रभात किरणांचे
उजळण्या रूप तिचे सूर्यास
त्या माथ्यावर बांधत होता
दारात वासुदेव बनून गात होता
छपरावरून अल्लड घसरत होता
फुलात कधी... तर बनात कधी
तो मोर पीसारा फुलवित होता
स्परशून त्या पापण्या अलगद
साखर झोपेस त्या जागवत होता
फुला पाणानवर दव बनून कधी
सदा फुलीला त्या लाजवत होता
नव्या दिसाचे नव्या उषेचे
नव नवे तोरण लावत होता
मी पुन्हा वाहणार असाच मना मनातून
रोजचाच-निराळा "पहाटवारा सांगत होता"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा