सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

रंगलेल्या मेहंदीने सख्या ,मला एक प्रश्न केला

जगात जर खरंच प्रेम नसतं
तर अख्खं जग मैत्रिमय असतं,
पण प्रेमाने तोंड पोळल्यावर मात्र
मन मैत्रीच्याचं शीतोष्ण धारेत रमत..!!


भरजरीचा शालीन काठपदर डोई
अखिल महाराष्ट्राची राजमाता जिजाऊ,
बाणेदारपणा ओतला रक्तात तिन्ही पिढ्यांच्या
मनी स्त्रीत्व बनलं तीनही नरवीरांची आऊ..!!



उशीने माझ्याकडे सख्या , तक्रार केलीय

तुझ्यामुळे म्हणे ,मी तिला विसरलीय

खरचं रे पण,तुझ्या हातांची जेंव्हापासून उशी मिळालीय

माझ्या डोळ्यांनी बघ झोपच विसरलीय !!!


ढोर मन माझं कुठल्याही भरातल्या पिकावर बसतं
सारासार विचार नाही त्याला सौंदर्याला भाळत ते बावळ,
आवरलं कितीदा हुसकलं बऱ्याचदा ह्या मोकाट ढोराला
वेसण असूनही संस्कारांची अर्ध्या हळकुंडाने ते पिवळ..!!

रंगलेल्या मेहंदीने सख्या ,मला एक प्रश्न केला

माझा रंग आवडतो कि ,तुझ्या प्रेमाचा तुला?

मी म्हंटल सखे,अग,ठावूक नाही का तुला?

त्याच्या आणि माझ्या प्रेमाचा तर ...रंग मिळालाय तुला !!!!!!!!!!!

साधारण समाजामध्ये
रात्र वैऱ्याची असते,
पण प्रेमात पडल्यावर मात्र
तिच्याचं आठवणींची असते..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा