मनातलं असं काहीतरी...२०
जेव्हा कधीतरी तसबीर तिची सामोरी येई....
आठवणींचे कोलाज अलगद हाक देई...
अंतरीचा किनारा तो अश्रूंना आपलासा होई..
स्पंदने स्वतःस वेगाने वेढून नेई...
उगाचच मग हुंदाकायाचे,
काळोखाने आपले पंख पसरावे,
केविलवाणे आपण अन आपेल प्रेम,
दोघेच प्रवासी, बाकी सारे मौन....
प्रेमाचे तरी काय चुकते?
ते नकळत आपल्याला उमगते,
शोक करुनी काय जगावे,
जगणे ते काय मरणाहुनी बत्तर...
प्रत्येक शब्द तिचा, श्वास तिचा,
कुपीतल्या अत्तराचा गंध जसा,
ये न पुन्हा...सांगावे परी तिला काय त्याचे,
तसबीर तिची अजूनच धूसर होत जाई...
तसबीर तिची अजूनच धूसर होत जाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा