सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

क्षणभगुर सुखामागे धावू पाहतय

का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?
मन या वेड्या भासातच
हरवून जाऊ पाहतय,
मृगजळमागेच का
बेभानपणे धावू पाहतय?
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

क्षणभगुर सुखामागे धावू पाहतय
माझ्या एकटेपणाला, तुझ्या एकटेपणात
विरघळून जावस वाटतय
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

दोनच पावल तुझ्यासोबत
चालावस वाटतय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

कातरवेळी हे मन
अस्वस्थ का होतय?
गर्दीतही मला
एकट-एकट वाटतय?
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

बंद पापण्या मागेही
का मला छळतस?
हा फक्त एक जीवघेणा भासच आहे
हेही मनाला जाणवतय
तरीही___
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय...?...का...?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा