सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मोर नाचतोय पहा

या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मोर नाचतोय पहा
श्रावणातला हिरवा शालू काय दिसतोय आहा

साहियाद्रीने पांघरली आहे हिरवीगार शाल
धबधब्यांची सोनेरी नक्षी नागमोडी चाल

थेंब थेंब दावांचा टिपण्या पाने आसुसलेली
तांबडे फुटताच किरणांनी पहा कशी टिपली

धन्य झालो देवा तुझे पाहुनी ऐसे रूप
मातृभूमीचा चरणामधले इथेच कळते सुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा