तुला भेटायला येताना..
मुद्दाम उशिरा येतो..
तेव्हाच तर तुझ्या नाकावरचा..
खोटा राग मनभरुन पाहत येतो..
जय हिंद चा नारा ऐकताच..
अंगात रक्त सळसळते ..
जरी असलो अलग धर्माचे..
तरी बांधव आम्ही या भारताचे..
नसानसात घुमतेय..
देश प्रेमाची ज्वाला...
पण आई बोलते, चल झोप..
आता उशिर खुप झाला.
अळवावरच्या पानावर..
पावसाचा एक थेंब साठला..
दवबिंदू या नावाने..
त्याने नवा उच्चांक गाठला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा