बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,

सांग ना पावसाला या बघून तुला सये
आठवतेय का गं ती कागदाची होडी,
अजूनही तोच गारवा अन तोच पाऊस
ओसरली आहे फक्त नात्यातील गोडी

काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,
सर्व झुगारून मोकळे, व्हावेसे मनी वाटले,
आला वारा ही रंगात, भोवरा संचारला अंगात,
झालो मी मुक्त वारू, हसलो वार्‍याच्या संगात

रात्रीचे हे निरभ्र आकाश..
माझ्या कडे काही मागतयं..
मी त्याला काय देणार..
माझंच तूझ्या प्रेमावर भागतयं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा