बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

माझ्या शिवाय तिला करमत नाही..!!

चारोळीच्या नशिबात,
"सुवर्ण" योग आहे..!
अमावस्ये नंतर,
पौर्णिमा आहे...!

होकार तिला देता येत नाही,
नकार तिला देता येत नाही..!
कितीही काहीही असले तरी,
माझ्या शिवाय तिला करमत नाही..!!


चार दिवस सासूचे
चार दिवस सूनेचे,
बाकीचे दिवस
घरातल्या पुरुषांचे!

आरशात पाह्यलं,
केसांची रूपेरी बट दिसली...
पुढ्च्याच महिन्यात लग्नाची
सिल्व्हर ज्युबिली आली..!

जखमांना ही बोलता आलं सये
खरंच खूप बर झालं असतं
किती घाव तिने केले गहिरे
जगासमोर तरी आलं असतं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा