गिरवतो अक्षरे कागदावर सये
ओठावरून जे माघारी फिरतात
दाद मिळते शब्दांना कधीतरी
तेव्हा अर्थ मिलनास झुरतात
हाटेच्या धुंद गारव्यात साथीला हे तळे,
लाजतो नभीचा चंद्र रूप पाहुनिया खुळे,
आरसपानी कशी तू त्याला पडलेलं कोड,
अप्सरेचा बाज कसा धरतीवर न कळे..!!
खूप काही बोलायचय तिच्याशी,
पण जीभच रेटत नाही..!
आग लागून सुद्धा आमचा
फटाकाच फुटत नाही..!!
एकच थेंब होता माझ्या डोळ्यात सये
मी म्हटलं का रे थांबलास एकटाच ?
तो म्हणाला पाठमोरी झाली रे ती वेडी
रूप साठवायचे आहे तिचे एका थेंबात ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा