पुन्हा आठवांचा थवा तुजकडे वळला जरासा
पापण्यांच्या ओजळी तून अश्रु ढळला जरासा
.
मुक्या भावनांच्या कानी पडले शब्द काही
अर्थ वेदनांचा काही त्यांना कळला जरासा
.
अंतरास त्या न लागला ठाव दोन पावलांचा
"मार्ग"तो एकटा चालण्या माघारी वळला जरासा
.
हृदयात त्या बंधिस्त निजली सारी स्पंदने
ओठातील एक नाजूक शब्द जळला जरासा
स्मृतीत त्या अस्पष्ट आकृत्या दिसल्या क्षणिक
"नीलेश"नशिबाचा नकाशा आता मळला जरासा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा