बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

प्रेम केलं की, शब्द ही सूचतात..

मी तुझ्याकडे पाहताना,
तू दुसरीकडेच पाहतेस..
मग साग ना उगीच कशाला,
माझ्या मनात येऊन राहतेस..!


नको येउस कधी फिरून माझ्या स्वप्नात,
मुक्त करून जा खुशाल सगळी मनाची बंधन,
समर्थ आहे मी माझ्या मनाचा घोट घ्यायला,
पण माजू देणार नाही कधीचं प्रेमाचं रणकंदन..!!


तुमच्या चारोळ्या पाहून,
मलाही एक चारोळी करावीशी वाटली..
काही चुकला तर माफ करा,
पण हि चारोळी कशी वाटली..!

प्रेम केलं की,
शब्द ही सूचतात..
ओठ नाही तर,
डोळे बोलतात..!



सुखालाही हवी असते..
साथ या दु:खाची..
आपण मात्र शोधायची असते..
दु:खातून वाट सुखाची..

तुला भेटायला म्हणून मी सये
खिडकीजवळ पाऊस बनून आलो
नकळत रोमांचित तुझ्या स्पर्शाने
हातावरून तुझ्या लगेच वाहून गेलो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा