प्रश्नांनी प्रश्नांना प्रश्न विचारले,
प्रश्नांनी प्रश्नातच उत्तर दिले,
प्रश्नांच्या या प्रश्नावलीने,
प्रश्नांचेच प्रश्नात रुपांतर झाले..
तुझ्या काळजाची धक धक,
मला पाहताच वाढते..
मी तुला भेटलो की,
माझ्या सोबतही असेच काही घडते..
तुझ्या रेशमी पदरात,
सुख आहे त्या चंद्र चांदण्यांचे,
सखे तुझ्या उश्याशीच तर..
मरण मला सुखाचे..
तुला कधीच कळाले नाही..
ते प्रेमाचे तीन शब्द..
तु फ़क्त बाजार मांडलास..
ज्या पुढे तु हि निशब्द...
आयुष्य हे एक रांगोळीच आहे..
त्यात कोणते रंग भरायचे हे आपणच ठरवायचे..
एखादा चुकीचा रंग भरला तर..
संपूर्ण रांगोळीची सुबकता निघून जाते..
माझे सर्वच प्रश्न..
तुला कोड्यात टाकतात..
त्यांची उत्तरे शोधताना..
तुला माझ्या जवळ आणतात..
खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!
पाऊस यावा पण महापुरासारखा नको,
वारा यावा पण वादळासारखा नको,
आमची आठवण काढा पण
अमावस्या पोर्णिमेसारखी नको..!!
मनकवडी तू मनमोहिनी
केलीस माझ्या मनाशी समेट,
आहेस तू मनाने मनाला दिलेली
मनासारखी मनमोहक भेट..!!
एवढे कच्चे नव्हते ते बंध..
ज्यांनी आपल्या हृदयाला बांधले होते..
सहज कसे तुटून जातील..
त्यात आपले मर्मबंध गुंतले होते...
आता पुन्हा मला..
शून्यातून उभारावे लागेल..
त्यात तरी मला..
तुझी साथ लाभेल...?
ऋतू बदलत असले,
तरी दिवस तेच राहतात..
एकदा निघून गेले ऋतू,
पुन्हा येत असतात..
आमोल घायाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा