मी बोलत राहिलो हुरळून.. सांगत राहिलो,
"किती छान दिसतय सगळं ईथून
ते दूरवर पसरलेले डोंगर.. गर्द हिरवे आच्छादन
नुकतीच दवात न्हावून निघालेली पाने
त्या तळयाचं निळशार पाणी.. लाजरे तरंग त्यावर
मुक्तपणे आकाशात विहार करणारे पक्षी
सगळं कस मनमोहक.. आल्हाददायक..."
तु तेंव्हाच स्तब्ध निर्विकार स्वरात उत्तरलीस,
"किती ओसाड दिसतय आजूबाजूला,
दूरवर कोणीच कस नाहिये.. कुठेच..
पारदर्शकता कमी झालीये बघ पाण्याची.
पाऊसही जरा प्रमाणात पडायला हवा,
हे काय.. जिकडे तिकडे चिक चिक नुसती..
जरा पाय ठेवायला जागा नाही कुठेच.
ह्यालाच का निसर्ग निसर्ग म्हणून डोक्यावर घ्यायचं."
मी चित्राकडे बोट करत विचारलं,
"ईकडेच पहाते आहेस ना तु?"
तुझं स्वयंचलित उत्तर लगेच आलं,
"एवढं महागड तिकिट काढून आलो ना प्रदर्शनाला,
मग दुसरे कुठे बघणार मी? मोजमापच नाही कुठल्या गोष्टीला,
ना पावसाला, ना चित्राला, ना काढणार्याच्या वेळेला, ना तिकिटाला."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा