निखारे निखारे ते चहुऔर सारे
पापण्याचे उठतील ओले पहारे
हे सांग वणवे कुण्या मालकीचे
आकाश तू झाकले नागडेच तारे
का जाणता मोडले नदीस त्या
का रेखिले तू बंध मोडके किनारे
तळास त्या जीव तगमगता असा
स्पर्शता नीर ते जागतील शहारे
मोजता दिशांना चुकशील जरासा
धरता मुठीत त्यांना पळतील वारे
तेज पुंज ते विझले शितीजा वरती
प्रकाशास ठाव दिसेना पुसे अंधारे
निसर्गास अश्या तळवे लाभले हिरवे
सरी गिळूनी तडे ते जमिनीवरी वावरे
घे लपेटून येथे जेवढे जेथे मिळाले
लाजाळूच तो स्पर्शता त्याला पसारा आवारे
आमोल घायाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा