गुरुवार, २८ जुलै, २०११

ते दोन सुखद क्षण

हात माझा हातात घेऊन सख्या

तू सांगतो म्हणालास भविष्य

अरे वेड्या ,पण हात हातात गुंफून

बघ चाललाय आपलच आयुष्य !!!!!!!!!!


तुला पाहताच मनी
खेळ भावनांचा दाटला,
तुझ्या एकाच कटाक्षाने
प्रेमाग्नी हा पेटला..!!


अजून सोडली नाही आशा..
तू परत येण्याची..
अजूनही तिथे वाट पाहतो तुझी..
जिथे सुरवात झाली आपल्या प्रेमाची..




तुझ्याचं साठी सखे
नभी हे शरदाचं चांदण,
ताऱ्यांमध्ये चंद्र जणू
कपाळीचं गोंदण..!!


आज ची रात्र,
मला खुपच छळतेय,
पुन्हा तुझी आठवणीत,
मन माझे जाळतेय...


अधिर मन झाले माझे,
अधिर झाल्या चांदण्या,
वाट पाहूनी तुझी,
किती भिजूनी गेल्या पापण्या..


ते दोन सुखद क्षण
काळजात रुतुन आहेत..
ते हि वेडे तुझी,
वाट पाहत गपचुप बसुन आहेत..




असतात काही प्रश्न,
कधीच न सुटण्या साठी,
त्यांना तिथेच सोडून द्यावे,
प्रश्नालाही प्रश्नात गुंतण्यासाठी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा