सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

आयुष्यभर ह्यांनी माझ्या शब्दांचे वाभाडे काढले

फ़ाटकी तुझी झोळी..
अन माझं नशीब फाटलेलं...
किती ठीगळं लावू त्याला..
ते जागो जागी गुरफटलेलं


पाणावलेल्या डोळ्यांनी
कोरडे आयुष्य पहिले
रंग उडून गेले होते सारे
फक्त व्रणांचे डाग ते राहिले...



आयुष्यभर ह्यांनी माझ्या
शब्दांचे वाभाडे काढले
पण मेल्यावर का होईना माझे
किंचितसे वजन वाढले....


सर्वच विचारतात मला सये
कसे फुलवले आठवांचे मळे
मी मात्र नियमित लपवले गं
आसवांचे ते साठवलेले तळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा