मनाच्या घडीव होडीला
विचारांची बेलगाम शिडं,
जीवन सागरात शांतता
ह्यांची उगाचंच फडफड..!!
जावूनी सांगा तिला
न फरक तिच्या जाण्यचा मला
अश्रूचे का वाहीन मी पाट
कोणी सांगितले मी पाहीन तिची वाट
ना घेईन साक्ष त्या प्रीतीची
ना भीती मजला तिच्या विरहाची
जरी कधी छळेल हा एकांत
भिऊ नकोस ......नाही जाणार कधी तुझ्या आठवणीत
देवपण घेऊन दगड
लागले आहेत मिरवू,
देवभोळेपणात माणसही
लागली त्यांना भरवू..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा