रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

दुखत असल्या वर जग कसा धावत येतो

तू परत येऊ शकशील
माझ्या वेदनेच्या वाटेवरून
बघ पोहोता येते का
माझ्या अश्रूंच्या लाटेवरून...


आज चार जण जमा झाले भोवती
खूप चांगला होता शब्द आले कानी
मीठ चोळले होते ज्यांनी जखमेवर
आज का त्यांच्याही डोळ्यात पाणी ?




बेजार तो माणूस
जिथे प्रेमाचा आजार
कंगाल होतो भावना विकून
असा वेडझवा बाजार....



दुखत असल्या वर जग कसा धावत येतो
प्रत्येक आसवांची माझ्या तो मजा घेतो
मग सुख त्यांना का बघवत नाही
मी हसताना मात्र ते माझ्या सोबत हसत नाही.....





क्षण साधले तुला बोलायचे म्हणून
पण क्षण तो येता सगळेच विसरले
तुला सांगायचे होते माझे प्रेम
पण ओठांवर येऊन शब्द परतले.


तुज हसवण्यास
मी रडू पाहतो
विरहाचे ते क्षण
भुलवू पाहतो


चार घासात
पोट भरवतो
बाकी सर्व सख्ये
तुझ्या ओंजळीत टाकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा