सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

हे नात प्रेमच हे नात विश्वासच

रिम झिम पावसात भिजल्यावर..
मन चिंब चिंब होऊन जाते..
मनाला ही मग पंख फुटुन..
आकाश विहार करावे वाटते..



हे नात प्रेमच हे नात विश्वासच
नाजूक धाग्याला बांधलेल्या मजबूत गाठीचं

हे नात पूजेच तेल आणि पणतीच
मांगल्याच प्रकाश देताना जळणा-या वातीच

हे नात फुलंच माती आणि पाण्याच
काट्यांना मागे सारून उमलना-या काळीच

हे नात प्रकाशाच उजळणा-या दिशाच
बाहेर पडणा-या किरणांना वाट दाखवणा-या समईच

हे नात आकाशच आकाशातल्या ढगांच
पाऊस होऊन मिसळणा-या मातीमधल्या सुगंधाच

हे नात मनाच ओवाळणा-या हातांच
ओवाळताना ताईच्या डोळ्यात जपलेल्या भावनांचं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा