सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

आरशात दिसणारं माझं प्रतिबिंब..

शरीराच्या नकाशात
मनालाही तिथकेच स्थान..
हृद्यात जे साठविले आहे..
त्यावर आधी त्याचाच मान..


मला कधीच जमले नाही..
माझ्या भावना ओठावर आणायला..
अन तुला हि खुप उशिर लागला..
त्यांना ओळखायला.

तुझ्या नाजुक ओठांवर..
तो पावसाचा थेंब तरळणारा..
मला तुझी ओढ लावतो..
तुझा स्पर्श मोहुन टाकणारा.


तुला भिजलेली पाहीले..
की पाऊसही गालात हसतो..
तु त्याला प्रतिसाद दिलास..
कि ढगांचा कडकडात होतो..


आज माझंच मन..
मला काही इशारा करतयं..
तुझ्या आठवणीत मला छळतंय़..
की तुला माझ्या जवळ ओढतयं..

आरशात दिसणारं माझं प्रतिबिंब..
आता तुझ्यात एक होऊन दिसते..
त्या निर्जिव आरशालाही प्रेम कळ्ते..
की तिथेही माझं मन फसते..


तुझे खळखळून हसणे..
अन त्यात माझं मन फसणे..
रोजचेच झाले हे..
खेळ तुझे जिवघेणे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा