सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

हॄद्यात माझ्या झाकून...

आरतीच्या ज्योतीत प्रेमाच्या औक्षणात सखे
कधी येतो मायेचा ह्या धाग्याच्या अतूट बंधनात
बहिणीच जतन ,भावाचं रक्षण अवीट गोडीचा सोहळा
उभा श्रावणही सामील भावा-बहिणीच्या आनंदात


रातरानीच्या सुगंधाने..
रात्र सारी मोहरुन गेली.
पौर्णिमेच्या चांदण्याने..
सृष्टी सारी सजून आली..

तुझा निरोप घेतला तरी..
पाऊले तिथुन हलत नाहीत..
तुझीच वाट पाहत असतात ते..
पण तू आता पुन्हा मागे वळत नाहीस..

मैत्री म्हणजे फुल प्राजक्ताचे..
फुलले की जिवन सुगंधी करणारे..
मैत्री म्हणजे काटे गुलाबाचे..
कितीही टोचले तरी सदा संरक्षण करणारे..


हॄद्यात माझ्या झाकून...
मनात तरंग उठवतेस..
होणारी ती चलबिचल पाहून..
गालात खुदकन हसतेस..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा