वसंताची कोकीळा का ग हि शरमिंदा
भुलली जणू ती जेव्हा छेडलीस तू तान,
मंजुळ सुरावटी सखे तिलाही पाडतात कोड
गर्वहरण जिथे कोकिळेचं................
राहिलं कसं बर ह्या सख्याला भान..??
मनाने घेतलं मनावर एकदा
नाही जायचं तिच्या आठवणींच्या गावा,
पण मनंच ते मनमानीचं वागणार
धाडलाचं फिरून त्याने आठवणींचा थवा..!!
साथ योग्य असेल साथीला
तर मैफिलीला रंग येतो.
शब्दही छान असतील जोडीला
तर गाण्याला छान सूर लागतो !!!!!!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा