मंगळवार, १ नोव्हेंबर, २०११

दिवस होतात आठवडे, आठवडे महिने न महिने वर्ष,

दिवस होतात आठवडे, आठवडे महिने न महिने वर्ष,

पण काही आठवणींचा मात्र कधीच सुटत नाही स्पर्श...

आईनी गायलेली ती बेसूर अंगाई,

तिच्या कुशीत घेतलेला तो सुखाचा श्वास,

आजही कधीतरी होतो त्याचा आभास.

ओल्या मातीचा तो सुगंध,

पहिल्या पावसाचा आतुर आनंद.

शाळेत जाण्याची प्रचंड भीती,

एकदा मित्र मिळाले की परत न येण्याची विनंती.

उशिरा येणार्या बाबांची वाट पाहणं,

ते आले की त्यांना पळत जाऊन मिठी मारणं.

त्यांनी सांगितलेल्या रात्रीच्या गोष्टी

ऐकून परी राणीच्या जगात रमण.

ते लपाछापी चे डाव,

तो लपंडाव चा खेळ...

ह्या निमित्ताने होणारा ,

रोज मित्रांशी मेळ.

रोजचे तेच खेळ,

न त्यात खरचटलेले पाय...

ते नसते तर

लहानपण असत तरी काय.

अंधारात जायची अतोनात भीती,

अश्या वेळी धड धड्णारी छाती...

त्या मधून येणारा आजोबांचा हात,

तो प्रेमाचा स्पर्श करी त्या भीती वर पण मात.

खाण्याची नाटकं ,

आवडी निवडी अनेक...

त्या साठी आईनी करावे

पदार्थ कित्येक...

गरम गरम वरण भात.,

न त्यावर साजूक तूप,

आजी नी ते भरवलं की मात्र,

आपोआप भूक लागे खूप.

रोजची शाळा

न शाळे नंतर खायचे पेरू व दाणे..

त्या साठी घरून मिळणारे फक्त ४ आणे.

हिवाळ्याची सुट्टी,

त्यात दुपारचे पेप्सी न गोळा...

पत्त्यांचे डाव रचायला जमणारा मित्रांचा मेळा.

अजूनही आठवतात ते दिवस

न होऊन जाता मन अवाक

जणू कानावर ऐकू आलेली एक अलगद हाक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा