मना बाहेरच्या स्मशानात
जाळले मी प्रेमाचे प्रेत
अखात बसलो त्याच राखेत
नवीन दुःखांचे बेत....
पाहत बसतो मी क्षितिजावर
पक्षी उडत जाताना
परत येईल प्रेम तसेच
एक एक धागा तोडत जाताना...
तू फक्त हसलीस
तर शब्द फुले होतात
तुझ्या स्पर्शाने काटेही
बोथट होण्यास तरसतात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा