अनुभवलेल्या नसतात ,पण आपल्याच वाटतात
मनात असतात, पण समोर दिसतात
स्वप्नात असतात ,पण डोळ्यात दिसतात
कानात बोलतात ,पण डोळे लाजतात
पावसात भिजतात ,पण चिंब करतात
साथ देतात ,पण अदृश्य असतात
गाण्यात असतात ,पण शांत राहतात
ओठात असतात ,पण अबोल बोलतात
गंधात असतात ,पण श्वासात फुलतात
वाऱ्यात डोलतात ,पण स्वप्नात झूलतात
गर्दीत झोपतात ,पण एकट्यात जागतात
नावात नसतात ,पण गावात असतात
नात्यात नसतात ,पण भात्यात असतात
का बरं असं त्या ,कोड्यात टाकतात ?
कांही आठवणी अशा का असतात ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा