तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या ,असं करावंसं वाटत !
आधीच गुंतलेल्या
शब्दांना माझ्या
तुझ्यातच विरून
जावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला.......
रात्रीचं चांदणं
चंद्राकडे मागून
दिवसाही सख्या
त्यांना उधळावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला ......
आभाळातून काळ्या
पावसाला चोरून
इंद्रधनुच्या रंगात
न्हावसं वाटतं
तू असतोस सोबतीला ..........
.
नजरेला माझ्या
उडायला सांगून
मनात तुझ्या रे
डोकावंसं वाटतं
तू असतोस सोबतीला ............
.
रात्रीला जागवणाऱ्या
डोळ्यातल्या स्वप्नांना
दिवसाही सख्या
बोलवावसं वाटतंय
तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या, असं करावस वाटतंय !!!!!
आधीच गुंतलेल्या
शब्दांना माझ्या
तुझ्यातच विरून
जावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला.......
रात्रीचं चांदणं
चंद्राकडे मागून
दिवसाही सख्या
त्यांना उधळावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला ......
आभाळातून काळ्या
पावसाला चोरून
इंद्रधनुच्या रंगात
न्हावसं वाटतं
तू असतोस सोबतीला ..........
.
नजरेला माझ्या
उडायला सांगून
मनात तुझ्या रे
डोकावंसं वाटतं
तू असतोस सोबतीला ............
.
रात्रीला जागवणाऱ्या
डोळ्यातल्या स्वप्नांना
दिवसाही सख्या
बोलवावसं वाटतंय
तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या, असं करावस वाटतंय !!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा