कालच्या रातीला आवं भलतंच हो घडलं,
कदी नव्ह ते दारात तिचं पाऊल पडलं..!!
लाजत मुरडत ठुमकत आली देखणी नार
नजर ठरना माझी आसं सोळा शिणगार..!!
आभाळातली अप्सराचं जणू परसन्न झाली,
मनातलं वळखून मला खेटून हो बसली..!!
मझ्याकडं बगून अशी हासली कल्लास,
आदीचं खुळा झालो मंग पुरता खल्लास..!!
हाळूचं कानात म्हटली मला "दिलाच्या दिलवरा",
तुमच्यासाटीचं केलाय बगा झ्याक ह्यो नखरा..!!
आवाज आयकून मोरपिसं काय अख्खा मोरचं फिरला,
पुढ्यात बसली ती जिच्यासाठी व्हता जीव झुरला..!!
नाजूक हाताची मिठी तिनं घातली जवा गळ्यात,
पिरतिचं पाखरू तवा धडपडू लागलं जाळ्यात..!!
मुका घ्याया तिचा केला म्या फुटक्या व्हटांचा चंबू,
रापकन हाणला तवाचं माझ्या आयन पेकाटात बांबू..!!
काय सांगू तऱ्हा राव...खरी नाय ती आली व्हती सपनात,
हात पिवळ करण्याचं कंदी यायचं आयसायबांच्या मनात..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा