मायेचा शीतल ओलावा की
अश्रूंचा हक्काचा गिलावा,
मनातली प्रेमळ भावना की
विरहातील विवंचना..!!
एक तळपत सूर्यकिरण की
धगीत जाळणारं सरपण,
रातीचा शांत चांदवा की
अगतिकतेतलं दुबळ मरण..!!
पवित्र असं गोमूत्र की
कोड्यात टाकणार सूत्र,
देव्हारीच्या देवाचं देवपण की
उकिरड्यावरचं मोकाट कूत्र..!!
शिंपल्यातला अनमोल मोती की
वाळवंटातील तप्त माती,
आठवणींनी भरलेलं हृदय की
श्वास संपलेली छाती..!!
पावसात भिजता चातक की
नशिबाने केलेलं पातक,
सुखदायी सुवर्ण सोहळा की
जन्मभराचं सुतक..!!
काय असतं प्रेम..??
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा