फुलपाखरु फुलांवर अलगद..
आपले रंग सोडून जातात...
काही मनातील भाव ही..
न सांगताच कळून जातात..
शब्दांनी शब्दांच्या भाषेत..
शब्द खेळ केले..
शब्दांच्या या खेळामध्ये..
शब्दच हरुन गेले..
शब्दांचा हा चोर खेळ...
आता जास्तच वाढला आहे..
तुझ्या साठी साठवलेला प्रत्येक शब्द..
तुझ्या समोरच अडला आहे..
कोसळणारा पावसात..प्रत्येक थेंब,
चिंब चिंब भिजवत आहे..
त्याच्या प्रत्येक थेंबात ..
तुझ्या स्पर्शाची जाणीव करुन देत आहे..
खळखळणारं नदीचं पाणी..
रानपाखरांची मंजूळ गाणी..
हिरवी गार झाली हि माती..
श्रावण स्तुती करु मी किती..
इंद्रधनुचे बांधत तोरण,
चहूकडे उधळत हिरवेपण,
सजलेल्या सृष्टीचा साजन,
उन्ह सांगते:
आला श्रावण,
श्रावण आला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा