मन हे वेड असते,
हे तुझ्या भोवती फ़िरताना समजले,
तूला मात्र ते..
कधीच नाही उमजले..
आज पावसाच्या थेंबात,
एक वेगळाच हर्ष दिसतोय..
जसा त्यानेही तुला..
केला स्पर्श वाटतोय..
आयुष्याच्या वाटेवर निर्णय घेताना,
आपणच आपले घ्यावे...
म्हणजे नंतर कुणाला दोष देताना..
आपलेच नाव पहीले यावे..
आला आला श्रावण आला..
घेऊनी नवी उम्मेद नवा बहर..
श्रावणाच्या आगमनाने..
झाडे वेली पाने फ़ुले.. डोलू लागली...
आला आला श्रावण आला...
घेऊन पुन्हा हर्ष नवा..
पक्षी गाती गीत नवे ..
झाडांवरती फुलती थवे...
आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..
आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
हट्ट करुन बाबांकडे पुन्हा एकदा..
पाहीजे ते मागावेसे वाटतेय..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा