पौर्णिमेच्या मागंपुढं चंद्राच्या ह्या कला,
तुझ्यासाठी सखे चंद्र कोरीचा हा झुला,
चांदण्यांच्या संगतीत चंद्रावरी झुले चंद्र,
अमावसेला मग राणी कवेत घेईल मी तुला..!!
तुला न पाहता..
तुझ्यावर रचले शब्द..
जर तुला पहिले तर..
माझे शब्दच होतील निशब्द..
लिहीन म्हणतोय तुझ्यावर..
गीत चंद्र ताऱ्यांचे..
चंद्राला हि मोहून टाकेल..
असे हे मोहक रूप तुझे सखे..
झरा जरी खळखळत असला..
तरी.. दऱ्या खोर्याचे सोसतो घाव..
तो जे जगतो त्याचेच..
तर जीवन असे नाव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा