स्वप्नांच्या त्या सागरात
पोहायला मी रोज जातो
परतताना नेहमी सोबत
विश्वासाचे मोती आणतो
काळंशार आभाळ चांदण्यासवे सये
अन रातराणीची दरवळ सुगंधाची
बघं मन वेडे आतुर भेटीस तुझ्या
जशी वाट पाहे चातक पावसाची
एकांताला पारखे दोन प्रेमी जीव
चंद्रात नि आपल्या प्रेमात काय फरक
दोघांमधून तिसरा कधीही न जाने
यालाच म्हणत असतील का गं नरक..!!
शब्दांनी ढाळली आसवे सये
चिंब झाले ते कागद प्रेमाचे
सूर साज चढविला आठवांनी
भिजले मन या खुळ्या पामराचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा