प्रतिबिंब उमटले बघं नयनात सये
मिठीत कसे दोन जीव विसावले
दिसता मिलनाचा रम्य सोहळा
सूर्याने मावळून चंद्राला जागवले..
नयनाच्या अथांग सागरात सये
बघं भावनांची नाव दिसत आहे
मावळत सूर्य हळूच निरोप देत
सोनेरी रंग विखरून हसत आहे
नकळत भेटलीस तू सये
नयनात मग अश्रू साठले,
तुझ्यासामोरी सांडण्या पूर्वी
पावसानेच बघं मला गाठले.
तुझ्या माझ्या नात्यात..
आहेत असे बंध..
जसे फुलावे मोगऱ्याचे फुल..
अन दरवळावा सुगंध..
तुला समोर येताच..
मनात माझ्या भरुन गेलीस..
तु ही मग तुझ्या डोळ्यांनी,
मला ओवाळून गेलीस.
थेंबभर माझं मन,
तुझ्या साठी वाहून गेले..
तू मला विसरलीस..
पण तुला विसरायचे राहून गेले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा