खोपा ....
खोपा जीवाचा बांधला
काडी काडी जीव येचून
कवा झुरला तो कवा झुलला
जीव जिवाले रायला टांगून
कवा झाली मी लेक, कवा माय
एका जीवाची शिदोरी राखून
घासा घासात जीव जगवला
चोची भरवले पिला,उपाशी राहून
खोपा माया म्हणवला म्या
फक झाडले,पिला सुखात ठेऊन
भीती जीवा लागली रे देवा
बळ येता पंखा,पिलं जातील उडून
जीव झाला रे म्हतारा आता
ओल आली खोप्या,एकटी रडून
सांभाळले जे,हारपले सारे
रायला,मायासंग खोपा एकटा पडून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा