जे काही दिव्य आणि उदात्त असत
ते इतकं सहजासहजी मिळत नसतं
,ते इतकं सहजासहजी मिळालं असतं,
तर मग त्याला इतकं महत्व कस आल असतं.
जगरहाटीच्या गाडग्यात
माणुसकीला तिलांजली,
फक्त माणूस उरला आता
मात्र मानवता गंजलेली..!!
सगळेच लागले होते मला...
तुझ्या नावाने चिडवायला...
तुला ते कधीच कळले नाही...
पण ते मला लागले होते आवडायला..
आभाळाचे डोळे भरून येता
तो बरसतो असा
तुझ्या आठवणींचा पाऊस
डोळ्यावाटे बरसावा जसा
तुला आवडायचे फुल...
म्हणून मी रोज घेऊन यायचो..
तुला आवडायचो मी...
म्हणून मी फुलून यायचो..
शान पुण्यनगरीची जिथं सारसबाग मानाचा तुरा
कर जुळती दोन्ही मधोमध रावळात विघ्नहर्ता,
आनंदाची खैरात तळ्यात पुणेरी तोऱ्याचं प्रतिबिंब
"हिरवळी" सोबत गवसते जिथे मनाची प्रसन्नता..!!
मीच तर दोषी असतो,
प्रत्येक वेळेस...
विनाकारण तुला रडवायचे..
अन मग कोपऱ्यात जाऊन रडायचे..
नशिबही आज कसं
धाय मोकलून रडतंय,
शापित भविष्य जाणूनही
का पुन्हा प्रेमात पडतंय..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा