ओल्या त्या पावसात मी चिंब...
मिठीत तुझ्या भिजलेले अंग...
तुझ्या श्वासात माझा श्वास...अन
पुन्हा पावसात भिजताना फक्त भास तुझा .
त्या भर पावसात
तुझी होती सोबत ...
म्हणून मी केली
थोडीशी गम्मत ..
तू आलास की,
पाऊस पड़ायचा ,
पुढचा प्रवास ,
आपोआप घड़ायचा.....
कळणार नाही माझ्यासोबत
घडणारा प्रवास तुला ...
क्षणोक्षणी देत जाईन
आनंदाची बरसात तुला ...
टीम टीमणारा दिवा..
काळोख छेडून जातो..
एवढासा तो दिवा पण..
आपल्याला अंधारातून प्रकाशात नेतो..
पावसाला पण कळतेय आता..
आपल्या वेड्या मनाची व्यथा..
तो हि वेडा आधीच बरसायला लागतो..
जेव्हा करतो आपण आपल्या भेटीची सांगता..
श्रावणाची लागली चाहूल..
झिम्माड झाली राने वने..
झाडांवरी फुलू लागली..
नवी पालवी नवी पाने..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा